mpsc पुणे पोलिसांकडून ऋषिकेश गांगुर्डे, सोमनाथ चव्हाण, गजानन शेळकेसह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल;

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या प्रकरणी आता मोठी बातमी समोर आली आहे. १५ एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावर आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे एमपीएससी आंदोलनप्रकरणी १५ विद्यार्थ्यांवर पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. एस एम जोशी मार्गावर हे आंदोलन सुरू आहे. मुख्य आयोजक प्रमोद पाटील, अक्षय कांबळेसह १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. १ ऑक्टोबरला बेकायदेशीर जमावाप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर यावर आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या मागे आम्ही वकिलांची फौज उभी करू. विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे जामीनपात्र आहेत. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेली ही कारवाई अन्यायकारक आहे. पोलिसांवर दबाव आहे. म्हणून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे विद्यार्थी नक्षलवादी आहेत का? कोर्टाची ऑर्डर विद्यार्थ्यांच्या बाजूने येईल, असं रोहित पवारांनी सांगितलं आहे.

रोहित पवार म्हणाले की, MPSC चे शुद्धीकरण व्हावे यासाठी आज सायंकाळी आपण गंगाआरती करणार आहोत. पुणे महापालिकेने किती नदी शुद्ध केली आहे ते आज आपल्याला कळेल. पण कोणतीही नदी असली तरी ती आपल्याला पवित्र अशीच आहे. सरकारने दिल्लीतील आंदोलनाला जाण्यासाठी रेल्वे बंद केल्या आहेत. ज्यांना दिल्लीला जायचे होते त्यांनी इथे आंदोलनात यावे, असं आवाहन यावेळी रोहित पवारांनी केले आहे.

एमपीएससी आंदोलनाचा आज ९ वा दिवस आहे. एमपीएससी आंदोलनामध्ये अन्नत्याग उपोषणाला बसलेल्या सात उपोषणकर्त्यांपैकी तीन उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडल्याचे समोर आले होते. मध्यरात्री ही आंदोलनस्थळी आंदोलकांची गर्दी पाहायला मिळाली आहे. आंदोलनकर्ते रस्त्यावर झोपून असल्याचे दिसून आले आहे. यामुळे आता याची चर्चा होत आहे.