Pune देशासहित राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटाचे खासदारांनी पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त करत शिंदे गटाची वाट धरली होती.
परंतु आता वारं फिरू लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचा बडा नेता पुन्हा ठाकरे गटात परतणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार गजानन किर्तीकर नाराज असल्याची माहिती हाती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या दिवसांत शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार गजानन किर्तीकर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कीर्तिकर हे उद्धव ठाकरे गटात पुन्हा प्रवेशाची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरू झाल्यानंतर गजानन किर्तीकर यांनीही यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
