Pune नाशिकच्या अशोक खरात प्रकरणात आता डोकं सुन्न करणारी माहिती समोर येत आहे. हे प्रकरण केवळ लैंगिक शोषणापुरते मर्यादित नसून, यात ड्रग्ज, संमोहन (Hypnosis) आणि राजकीय वरदहस्ताचा मोठा समावेश असल्याचे समोर येत आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. अशोक खरातने ‘ओश्नो जल’ आणि ‘सिद्ध प्रे’च्या नावाखाली एक मोठे जाळे विणले होते, अशा माहिती देखील खरातने समोर आणली आहे.
‘ओश्नो जल’चे धक्कादायक वास्तव
अंजली दमानिया यांच्या दाव्यानुसार, अशोक खरात एक विशेष प्रकारचे पाणी तयार करायचा, ज्याला तो ‘ओश्नो जल’ म्हणायचा. हे जल म्हणजे प्रत्यक्षात कफ सिरप, पाणी आणि कुटून टाकलेली ‘वायग्रा’ (Viagra) गोळ्यांचे मिश्रण असायचे. हे ओश्नो जल मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील विविध पक्षांचे नेते आपल्या गाड्या आणि चक्क हेलिकॉप्टर अशोक खरातकडे पाठवायचे. यात तिरुपती बालाजी ट्रस्टच्या एका ट्रस्टीचाही समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात केवळ एका पक्षाचे नाही, तर अनेक पक्षांमधील नेते आहेत.
