Rupali Chakankar छत्रपती संभाजीराजे संतापले, थेट मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी, राजीनामा देत नसतील तर चाकणकरांची हकालपट्टी करा!

Pune महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विषयीचा वाद थांबण्याची चिन्हे नाहीत. त्यांच्या राजीनाम्यासाठी सतत विविध नेत्यांक़डून नवा राजकीय दबाव निर्माण होत आहे.

त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी भोंदू बाबा कॅप्टन खरात याचे पाद्यपूजन केले. त्याच्या मंदिराच्या त्या विश्वस्त आहेत. बाबाच्या डोक्यावर छत्री धरली, यांपासून तर अनेक वाद पुढे आले.

महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी या भोंदू बाबाचे पाय धुतले. त्या त्याच्या मंदिराच्या विश्वस्त आहेत. हे ऐकून अक्षरशः शिसारी आली. कान बंद करावेसे वाटले. या बाई कोणत्या काळात वावरत आहेत. कोणत्या महाराष्ट्रात राहत आहेत? असा प्रश्न त्यांनी केला.

श्रीमती चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. आणि भोंदू बाबा महिलांवर अत्याचार करतो. हे ऐकून देखील किळसवाणे वाटले. ऐकताना कान बंद करावेसे वाटले. आपल्या महाराष्ट्रात हे घडते आहे याचे वाईट वाटते.

या बाई अद्याप आपल्या पदावर कशा काय राहिल्या?. त्यांनी नैतिकदृष्ट्या केव्हाच राजीनामा द्यायला हवा होता. त्यांनी दिला नाही तर माझे मुख्यमंत्र्यांना सांगणे आहे, त्यांनी तात्काळ त्यांना बडतर्फ करावे. त्यांचा राजीनामा घ्यावा. त्याला अन्य कोणताही पर्याय नाही, असे माजी खासदार संभाजीराजे म्हणाले.

महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यासाठी सातत्याने दबाव वाढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटले आहेत. भाजपनेही आक्रमक स्वरूप धारण केले आहे. यातून राजकीय संकेत स्पष्ट आहेत. त्यामुळे चाकणकर यांची राजकीय कारकीर्द काय वळण घेते? यावर आता चर्चा सुरू आहे.