संकटात मानवतेचा आधार; पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अंकुश मोरे व काजलदीदी मोरे धावले केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
मुळशी प्रतिनिधी -: मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात अनेक गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊन त्या भागातील बहुतांश कुटुबांचे संपुर्ण जीवन उध्वस्त झाले आहे.
एक हात मदतीचा या उक्तीप्रमाणे पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत मिळावी यासाठी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष अंकुश मोरे व मुळशी पंचायत समितीच्या सदस्य काजल ताई मोरे यांनी आज घुटके गावातील पूरग्रस्तांना एक मदतीचा हात देत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
याचबरोबर त्यांनी गावातील परिसराची पाहणी केली व प्रशासनाला तात्काळ सूचना देऊन तात्काळ शासन मदत व पंचनामे करण्याची त्यांनी सूचना दिल्या.
याप्रसंगी भांबर्डे – घुटके ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री.मारुती कुडले, संजय झोरे, सुनील कुडले, कृष्णा कुडले, मंगेश झोरे, पांडुरंग कुडले, दत्तू कुडले, शरद कुडले, भरत कुडले, मारुती सरूसे, भरत दिघे, मंगेश दिघे, विनायक लोयरे, गीताबाई भरणे, सविता कुडले, हिराबाई कुडले, कुंदा जोरी, बाबाबाई कुडले, अलकाबाई कुडले यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते.
