पुणे :- राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला गती देण्यासाठी अतुल बबनराव धावडे यांची खडकवासला मतदारसंघ युवक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरदचंद्र पवार यांच्या विचारांना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि युवक संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने करण्यात आली.
नियुक्तीपत्र प्रदान करताना मा. खासदार सुप्रिया सुळे, पुणे महानगरपालिकेचे गटनेते काकासाहेब चव्हाण, नगरसेविका अनिता इंगळे यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
अतुल धावडे हे सामाजिक, शैक्षणिक व युवकांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने कार्यरत असून परिसरात त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे खडकवासला मतदारसंघातील युवक संघटनेला नवी ऊर्जा मिळणार असल्याची भावना पक्ष कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अतुल धावडे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पक्षाची विचारधारा युवकांपर्यंत पोहोचवून संघटना अधिक सक्षम व व्यापक करण्यासाठी ते प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
नियुक्तीनंतर बोलताना अतुल धावडे यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, पक्ष संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी आणि युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. खडकवासला मतदारसंघातील युवकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच पक्षाच्या धोरणांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असे त्यांनी सांगितले.
