कातरखडक गावठाण व पिंपळोली-गवारेवाडी येथे रोटरी क्लबच्या माध्यमातून RO फिल्टर प्लांटचे लोकार्पण

मुळशी प्रतिनिधी : ग्रामस्थांना शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून कातरखडक गावठाण तसेच पिंपळोली-गवारेवाडी येथे RO फिल्टर प्लांटचे लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरातील ग्रामस्थांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.

रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री. शैलेंद्र चोबे यांच्या सहकार्याने तसेच रोटरी क्लबच्या सदस्या दीपा भागवत आणि गोमुख संस्थेचे अध्यक्ष अश्विन परांजपे यांच्या मार्गदर्शनातून उपलब्ध झालेल्या RO फिल्टर प्लांटचे लोकार्पण करण्यात आले.

या उपक्रमासाठी मुळशी पंचायत समितीच्या सभापती मंदाताई बाबाजी शेळके यांनी संस्थेकडे सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यावेळी त्यांनी रोटरी क्लबच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत, क्लबच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती घेतली.

ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ व शुद्ध पाणी अत्यंत महत्त्वाचे असून, त्यासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून राबविण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद व समाजोपयोगी आहे, असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवर

या लोकार्पण सोहळ्यास मुळशी पंचायत समितीच्या सभापती मंदाताई बाबाजी शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष बाबाजी शेळके, विजय गुंड, जालिंदर ढमाले, कातरखडकच्या सरपंच सौ. सारिका शंकर चव्हाण, माजी सरपंच वंदना गवारे, उपसरपंच शंकर दशरथ चव्हाण, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नवनाथ मनोहर मालपोटे, पोलीस पाटील सौ. शंकुतला शंकर मालपोटे, सी.आर.पी. सौ. मनीषा श्रोतीदास मालपोटे, सौ. शीतल विलास मालपोटे, सौ. दिपाली सचिन मालपोटे, सौ. मंगल सोपान मालपोटे, सौ. अरुणा कृष्णा मालपोटे, श्रीमती रेखा रमेश कांबळे, वसंत राव मालपोटे, संकेत शौद्र मालपोटे, सोपान बाबू मालपोटे, मनोहर किसन मालपोटे, पांडुरंग सोपान मालपोटे, शंकरराव गवळे मालपोटे, गोविंद नथू मालपोटे, लक्ष्मण बाबू मालपोटे, कुंडलिक मालपोटे यांच्यासह कातरखडक, पिंपळोली व गवारेवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.