Pune News सोने आणि चांदीच्या किमतीत आज आठवड्याच्या पहिल्या दिवशीच सोमवारी घसरण झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर सोने आणि चांदी स्वस्त झालं आहे. मौल्यवान धातूच्या किमतीतील घसरण सलग दुसऱ्या आठवड्यातही सुरू आहे.
सोन्याचा भाव २००० रुपयांनी घसरला आहे. तर चांदीच्या दरात ५४०० रुपयांची घसरण झाली आहे.
सराफा बाजारातील सोने-चांदीचा दर काय?
गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सराफा बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १४२० रुपयांनी घसरला. या घसरणीसह सोने दर १,४२,९१० रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहेत. २२ कॅरेट सोन्याचा भाव १३०० रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे २२ कॅरेटचा एक तोळ्याचा भाव १,३१,००० इतका आहे. १८ कॅरेट सोन्याचा भाव १०७० रुपये इतका एका तोळ्यामागे कमी झाला आहे. त्यामुळे १८ कॅरेट सोनं भाव आज १,०७,१८० रुपये इतकं आहे.
