महापालिकेसाठी ठाकरे शिवसेनेची जोरदार तयारी, प्रचारात आघाडी घेत ‘ सोसायटी धारकांचा मोठा प्रतिसाद

पुणे धायरी प्रतिनिधी -: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रभाग 33 मधून जोरदार प्रचार सुरू केलाय. धायरी कोल्हेवाडी सणसवाडी धायरी गावठाण भागात त्यांनी प्रचार केलाय.

पुणे महानगरपालिका ( PMC Election) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेला प्रचार दौरा अतिशय आपुलकीच्या आणि जिव्हाळ्याच्या वातावरणात झाला.

धायरी गावठाणातील नागरिकांचा प्रामाणिक प्रतिसाद आणि मनापासून केलेले स्वागत मनाला भावणारे होते.

या भेटीदरम्यान गावठाणातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवकांशी संदीप पाटीलबुवा मते यांनी थेट संवाद साधत त्यांच्या दैनंदिन अडचणी, मूलभूत सुविधा, स्थानिक प्रश्न तसेच भविष्यातील विकासाबाबतच्या अपेक्षा समजून घेतल्या. तसेच विविध सुविधा आणि गावठाणाच्या सांस्कृतिक ओळखीला जपणारा विकास या मुद्द्यांवर नागरिकांशी चर्चा करून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली

समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी स्वतंत्र नियोजन
परिसरातील समस्या तात्पुरत्या नव्हे तर कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी स्वतंत्र नियोजन व प्रभावी पाठपुरावा करण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. विकासाच्या प्रक्रियेत गावठाण मागे राहणार नाही, तर त्याची ओळख अबाधित ठेवत आधुनिक सुविधांचा समतोल साधला जाईल, ही भावना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली.

नागरिकांशी विश्वासाचं नांत अधिक दृढ

हा प्रचार दौरा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित न राहता, गावठाणातील नागरिकांशी विश्वासाचं नातं अधिक दृढ करणारा ठरला. स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देणारी, लोकांशी जोडलेली आणि जमिनीवर काम करणारी कार्यपद्धती आम्हाला अतिशय भावली असल्याचे मत येथील नागरिकांनी मांडले.
परिसरातील नागरिकांनी व्यक्त केलेला विश्वास, आशीर्वाद आणि वाढता सहभाग पाहता, हा दौरा निश्चितच विश्वास देणारा आणि विजयाच्या दिशेने प्रेरणा देणारा ठरला असल्याचा विश्वास संदीप मते यांनी व्यक्त केलाय.