माण गणात कमळ फुलवण्यासाठी कार्यकर्ते सज्ज; युगंधरा पारखीच्या प्रचार रॅलीला भव्य प्रतिसाद

युगंधरा पारखीच्या भव्य संवाद दौऱ्यामुळे; माण पंचायत समिती गण भाजपामय

मुळशी प्रतिनिधी -: भारतीय जनता पार्टीच्या 69 माण पंचायत समितीच्या उमेदवार सौ. युगंधरा नवनाथ पारखी यांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला; तरुणांनी घोषणा देत परिसर गजबजुन टाकला.

या रॅलीची सुरुवात चांदे, नांदे, मुलखेड, घोटावडेगाव, पडघळवाडी, लांडगेवाडी, भेगडेवाडी, आमलेवाडी, बोडकेवाडी, रसाळवाडी, जवळगाव, पिंपळोली, कातर खडक, खांबोली, गवारेवाडी, शेळकेवाडी, आंधळे, रीहे खोऱ्यातील सर्व वाड्या वस्ती मातेरेवाडी, या गावांमधून संवाद रॅलीला भव्य प्रतिसाद पाहायला मिळाला.

प्रत्येक गावातील महिला भगिनींनी पंचायत समितीच्या उमेदवार सौ. युगंधरा नवनाथ पारखी यांचे औक्षण करत त्यांना मतरूपी आशीर्वाद देण्याचे आश्वासन दिले.

या भव्य दिव्य रॅलीमुळे माण पंचायत समिती गणातील वातावरण भाजपा मय झाल्याचे दिसून आले.

माण पंचायत समिती गणातील गावातील सर्वांगीण विकास घडविण्यासाठी तसेच इच्छाशक्तीच्या जोरावर,महिलांच्या बचत गटासाठी लघु उद्योग आणि महिला स्वलंबनासाठी, नागरी सुविधांसाठी, तरुणांना स्वतःचा उद्योग उभारणे असे विजन घेऊन या निवडणुकीमध्ये सौ.युगंधरा नवनाथ पारखी या निवडणुकीला सामोरे जात आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव नवनाथ पारखी यांनी केले.