पुणे प्रतिनिधी -: गेल्या अनेक वर्षापासून पुणे महापालिकेवर प्रशासकराज होते मात्र या प्रशासक धोरणाला पुणेकर मात्र पक्के वैतागले होते; यावर्षी पुणे महापालिकेच्या निवडणुका झाल्या अनेक वर्षानंतर सभागृह कामकाज चालू झाले याच पार्श्वभूमीवर आज वारजे भागातील नगरसेवक सचिन दोडके यांनी प्रशासनावर हल्लाबोल केला जनतेच्या मनातील प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले यावेळी त्यांनी सभागृहात
शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांसह डीपी रोड रस्ता रुंदीकरणाच्या कामावरून नगरसेवक सचिन दोडके यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत आक्रमक भूमिका घेतली. संबंधित बैठकीत त्यांनी आयुक्तांसह अधिकाऱ्यांना थेट जाब विचारत नागरिकांच्या अडचणींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला.
डीपी रोड रस्ता रुंदीकरण प्रक्रियेत प्रशासन नागरिकांवर अन्याय करत असून, खाजगी मोजणी करण्याची जबाबदारी सर्वसामान्य नागरिकांवर टाकली जात असल्याचा गंभीर आरोप दोडके यांनी केला. “हे काम प्रशासनाचे असताना नागरिकांना ते करायला लावणे अन्यायकारक आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
तसेच, या प्रक्रियेत वयोवृद्ध नागरिकांना वारंवार कार्यालयीन चकरा मारायला लावून त्यांची गैरसोय केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. “वयोवृद्धांना खेळवण्याचे काम प्रशासन करत आहे, ही अत्यंत खेदजनक बाब आहे,” असे ते म्हणाले.
याबाबत आयुक्तांनी तातडीने लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना द्याव्यात व नागरिकांना होणारा त्रास त्वरित थांबवावा, अशी मागणी दोडके यांनी केली.
