म्हातोबा उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी सागर साखरेंची एकमताने निवड

हिंजवडी : चैत्र पौर्णिमेनिमित्त होत असलेल्या पारंपरिक वैभवशाली ग्रामदैवत म्हातोबा उत्सवनिमित्त पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याला उत्सव तयारीची आढावा बैठक सालाबादप्रमाणे यंदा मारुती मंदिरात पार पडली. या बैठकीत ‘म्हातोबा उत्सव कमिटी’च्या अध्यक्षपदी सागर सुखदेव साखरे यांची एकमताने निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी अमित काळूराम जांभुळकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली; याप्रसंगी गावातील आजी,माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावातील सर्व जुन्या जाणत्या मंडळींना विश्वासात घेऊन गावाचा पारंपरिक उत्सव भक्तिभावाने तसेच शांततेत पार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. या जबाबदरीमुळे ग्रामस्थांच्या विश्वासास पत्र ठरलो आहे.

– सागर सुखदेव साखरे, नवनिर्वाचित अध्यक्ष.