Rain Update : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा परतणार, दसऱ्यानंतर या तारखेपासून पंजाबराव डख

Pune सध्या राज्यात पावसाने दडी मारलीय. शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगाम गेलाय. पाऊस नसल्याने मराठवाडा, विदर्भात विहिरी कोरड्या पडल्या आहेत. राज्य सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केलाय.

त्यानुसार शेतकऱ्यांना मदत केली जात आहे. दरम्यान, खरीब हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेलेला असला तरीही रबी हंगाम अद्याप बाकी आहे. रबी हंगामाच्या पेरण्या होण्यासाठी तरी राज्यात पाऊस यावा, अशी आशा शेतकरी लावून बसले आहेत. असे असतानाच आता हवामानाची माहिती देणारे पंजाबराव डख यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. दसऱ्यानंतर राज्यात पाऊस येऊ शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय.

परतीचा हा पाऊस निर्णायक असेल

राज्यात परतीचा पाऊस येणार आहे. हा पाऊस शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असेल. एकूण चार दिवस दिवस हा पाऊस असेल. 21 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबरपर्यंत पासवाचा राज्यात मुक्काम असेल. या काळात रोज राज्यातील वेगवेगळ्या भागात पाऊस पडेल. परतीचा पाऊस येणार आहे. त्यामुळे रब्बीच्या पेरण्या होतील. परतीचा हा पाऊस निर्णायक असेल, असं डख यांनी सांगितलंय.

कोणकोणत्या जिल्ह्यातं येणार पाऊस

बंगालची खाडी तसेच अरबी समुद्रात तापमान वाढल्याने बाष्प तयार होईल. याच बाष्पामुळे परतीचा पाऊस येईल. हा पाऊस सोलापूर जिल्हा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा, अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशीव, नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळ, वाशीम या जिल्ह्यात 21 ते 24 या काळात पावसाला सुरुवात होईल. नंतर हा पाऊस पुढे सरकेल. पुढे सरकत हा पाऊस जळगाव, धुळे, नंदूरबार, अकोला, अमरावती पर्यंत जाईल. हा पाऊस तेलंगाना, कर्नाटकहून येईल, असे पंजाबराव डख यांनी सांगितले.

13 नोव्हेंबर रोजी थंडीला सुरुवात होईल