Baramati सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक यंदा केवळ सहकाराची निवडणूक न राहता बारामतीच्या राजकारणाची मोठी कसोटी ठरली. अजित पवारांच्या निधनांनतर ही पहिलीच अटीतटीची निवडणूक होती.
अखेर या निवडणुकीत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या पॅनलनं वर्चस्व मिळवलं असून बारामतीचं मैदान राखत सुनेत्रा पवारांनी विरोधकांचं आव्हान संपुष्टात आणलं आहे. सोमेश्वर कारखान्यात युगेंद्र पवारांच्या पॅनलला एकही जागा मिळाली नाही तर सुनेत्रा पवारांच्या पॅनलला विक्रमी मताधिक्य मिळाले आहे. सुनेत्रा पवारांच्या सर्व विजयी 21 उमेदवारांची यादी वाचा…
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी स्वतंत्र पॅनल उभे केले होते. मात्र, मतमोजणीअंती युगेंद्र पवार यांच्या पॅनलमधील एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. या पॅनलला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या उमेदवारांना मोठे मताधिक्य मिळाले. प्रतिस्पर्धी पॅनलच्या उमेदवारांचा सुमारे साडेसहा ते आठ हजार मतांच्या फरकाने पराभव झाल्याचे चित्र समोर आले आहे.
गट क्रमांक १ – निंबूत खंडाळा
| अ.क्र | उमेदवाराचे नाव | गाव |
| 1. | अभिजीत काकडे | निंबुत |
| 2. | प्रमोद भगवानराव काकडे | निंबुत |
| 3. | डॉ. वसंतराव दगडे | नीरा शिवतकार |
| 4. | शैलेश रासकर | खंडोबाची वाडी |
| 5. | अशोक धायगुडे | अंदोरी |
गट क्रमांक 2. मुरुम वाल्हा
| 6. | विक्रम भोसले | वाणेवाडी |
| 7. | ऋषीकेश गायकवाज | करंजे पूल |
| 8. | राजवर्धन शिंदे | मुरुम |
| 9. | संग्राम सोरटे | सोरटेवाडी |
गट ३ – होळ मोरगाव
| 10. | रविंद्र भापकर | लोणी भापकर |
| 11. | मकरंद सस्ते | सस्तेवाडी |
| 12. | मनिषा होळकर | सदोबाची वाडी |
| 13. | द्वारकोजी साळवे | वडगाव नि |
गट क्रमांक ४ को-हाळे सुपा
| 14. | राजेंद्र बोरकर | बोरकरवाडी |
| 15. | अक्षय खलाटे | माळवाडी लाटे |
| 16. | सुनील भगत | को- हाळे बु. |
| 17. | प्रणिता खोमणे | कोऱ्हाळे खु. |
गट ५ – मांडकी जवळार्जुन
| 18. | सतिश जगताप | मांडकी |
| 19. | सुधाकर टेकवडे | जवळार्जुन |
| 20. | उत्तम धुमाळ | जेऊर |
| 21. | छबुबाई नाझिरकर | नाझरे |
