उंड्री प्रतिनिधी -: राज्यात सध्या महानगरपालिकेची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष जोमात प्रचार करत आहेत. अवघ्या 2 दिवसांवर मतदानाचा दिवस आल्यामुळे प्रचारासाठी पूर्ण ताकद लावली जात आहे.
यावेळी आमच्या प्रतिनिधीने शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांना विचारले असता ते म्हणाले की या राज्याचे नगर विकास मंत्री तथा तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टी खाली झालेला विकास याच जोरावर आम्ही ही निवडणूक लढवली आहे संपूर्ण शहरासह प्रभाग क्रमांक 41 चे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला.
आपल्या भागातील उर्वरित विकासासाठी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मतांनी विजयी करा निश्चित उद्या होणारा पुण्यनगरीचा महापौर शिवसेनेचा असेल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवसेना पक्ष सामान्य जनतेशी थेट जोडलेले नेतृत्व आहे. त्यांनी आजवर समाजातील प्रत्येक घटकासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. पाणी, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच युवक आणि महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्याची त्यांची स्पष्ट भूमिका आहे.” पुढे बोलताना त्यांनी शिवसेनेचा विकासाभिमुख धोरणांचा उल्लेख केला.
