राष्ट्रवादी खडकवासला विधानसभा अध्यक्षपदी संदीप मते पाटील यांची निवड
पुणे प्रतिनिधी (Pune News Ncp)-: खडकवासला विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुणे शहरातील संघटनात्मक बांधणीला गती देण्यासाठी महत्त्वाचे बदल करण्यास सुरुवात केली आहे.
याच पार्श्वभूमीवर खडकवासला विधानसभा अध्यक्षपदी संदीप मते पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीचे पत्र आज पुणे येथे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे पुणे शहराचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
महापालिकेतील संधी थोडक्यात हुकली; पक्ष नेतृत्वाचा पुन्हा मतेंवर विश्वास
संदीप मते पाटील यांचा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनुभव लक्षात घेऊन पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे,
पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३३ मधून त्यांनी पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.
अवघ्या काही अल्पशा मतांनी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला मात्र खचून न जाता पुन्हा जनतेत जाऊन ते कामाला लागलेला पाहायला मिळाले
अवघ्या काही मतांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला, मात्र त्या पराभवाने न खचता त्यांनी पुन्हा जनतेत जाऊन नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. जनतेशी असलेली नाळ कायम जपत त्यांनी विकास आणि लोकसेवेचा वसा अखंडपणे पुढे सुरू ठेवला.
पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे सोने करणार; २०२९ च्या तयारीसाठी संघटन मजबूत करणार
खडकवासला विधानसभा अध्यक्षपदी नियुक्तीनंतर बोलताना संदीप मते पाटील यांनी पक्ष नेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पक्षाने दिलेली जबाबदारी ही माझ्यासाठी मोठी संधी असून या जबाबदारीचे सोने करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खडकवासला विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटना अधिक सक्षम आणि बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील. आगामी २०२९ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील प्रत्येक भागात कार्यकर्त्यांचे संघटन वाढवून पक्षाची ताकद तळागाळापर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
“पक्ष संघटनेचे बळ हेच आमचे खरे सामर्थ्य आहे. कार्यकर्त्यांना सोबत घेऊन खडकवासला विधानसभा मतदारसंघात पक्षवाढीसाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक जोमाने काम केले जाईल,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
