पुण्यात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान व कवी संमेलन उत्साहात

पुणे प्रतिनिधी | एस. एन. नांदेडकर

८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महामाता रमाई यांच्या प्रतिमेला उपस्थित सर्व महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

यावेळी रमाईपुत्र विठ्ठलदादा गायकवाड तसेच साप्ताहिक राष्ट्रपरीवारचे संपादक शैलेंद्र मोरे यांची प्रमुख होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तृतीयपंथी प्रतिनिधी डॉ. आम्रपाली मोहिते होत्या, तर स्वागताध्यक्ष म्हणून इंजिनिअर चेतन लिंबेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड. नितीन घोडके यांनी केले.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवर महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यामध्ये मनिषा अरविंद केदारी (सामाजिक कार्यकर्त्या), कु. सेजल सुनिल धरपाळे (राज्यस्तरीय कुस्ती विजेती – महिला गट), दौलतजहाँ दिलावर शेख (शिक्षिका), सुनिता दत्ता सोनकांबळे (विमुक्त भटक्या जाती-जमाती प्रवर्गासाठी कार्यरत अंगणवाडी शिक्षिका), सुलक्षणा जीवनराव दाभाडे (शिक्षिका), तहेसीन मुजावर चिंचोलकर (स्त्री दर्पण हिंदी मासिकाच्या संपादिका) आणि अॅड. तृप्ती हौसराव म्हस्के (वकील व कायद्याच्या अभ्यासक) यांचा समावेश होता.

सन्मानित महिलांना विशेष सन्मानपत्र, ग्रंथ आणि पंचशील देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान डॉ. आम्रपाली मोहिते व अँड. नितीन घोडके यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच प्रियंका सुरेखा उत्तम, मिरा हरिश्चंद्र सोनटक्के, रश्मी उज्ज्वला रमेश यांचाही गौरव करण्यात आला.

कार्यक्रमानंतर आयोजित कवी संमेलनात कवी मिलिंद सोनकांबळे, रश्मी उज्ज्वला रमेश, प्रियंका गायकवाड, अँड. नितीन घोडके, मुकुंदराव उत्तमराव सूर्यवंशी यांनी आपल्या कवितांद्वारे उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कवी संमेलनासाठी मिलिंद सोनकांबळे यांनी विशेष सहकार्य केले.
यावेळी अरविंद शिंदे, सुहास शिंदे, सुनिल धरपाळे, दत्ता सोनकांबळे, सतीश हातोले, हेमंत ठाकरे, छाया धरपाळे, प्रेमिला दाभाडे तसेच रमाई वधू-वर सूचक मंडळाच्या प्रमुख विजयाताई सुनिल सोनवणे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत देठे, हरिश मोहिले, हेमंत ठाकरे, सतीश हातोले, आकाश दादा, अमोल श्रीगोंदा यांच्यासह आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ या संस्थेच्या सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघशिल भद्रे यांनी केले, तर अध्यक्षीय समारोप डॉ. आम्रपाली मोहिते यांनी केला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती.