pune लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. यात काही मंत्र्यांना डच्चू देऊन त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. अशातच आता अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे.
अजित दादांच्या निधनापूर्वी अजित दादांकडे हे अर्थखातं होतं, मात्र अजित दादांच्या निधनानंतर अर्थखातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडेच ठेवलेले आहे. मात्र गेल्या काळापासून राष्ट्रवादीने हे खातं पुन्हा आपल्याकडे मागितले असल्याचे समोर आलेले आहे. मात्र अद्याप हे खातं राष्ट्रवादीला देण्यात आलेले नाही. अशातच आता एका बड्या नेत्याने लवकरच हे खातं राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा दावा केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
15 दिवसात अर्थमंत्रिपदाचा निर्णय होणार – संजय काकडे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काकडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर राज्यातील अर्थमंत्री पदाचा निर्णय 15 दिवसात होईल असं काकडे यांनी म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे.
