राहुल पोकळेंची उमेदवारी नाकारणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला महागात पडणार कार्यकर्त्यांची आक्रमण भावना
Pune news राज्यात महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत आता संपली आहे. सर्वच पक्षाकडून इच्छुक उमेदवार आता रिंगणात उतरले आहे. पण, पुण्यात अजित पवार गटाकडून गुन्हेगारांना तिकीट दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
मोक्का गुन्हा असलेल्या उमेदवाराला अजित पवार गटाकडून उमेदवारी दिल्याचं उघड झालं आहे.
प्रभाग क्रमांक 33 मध्ये स्वच्छ चरित्र असणाऱ्या उमेदवाराची उमेदवारी नाकारली
प्रभाग क्रमांक 33 मधून धायरी कोल्हेवाडी खडकवासला शिवणे भागातून राहुल पोकळे यांना अजित पवारांनी तयारी करण्यास सांगितले त्याप्रमाणे त्यांनी सर्वत्र पूर्ण यंत्रणा कामाला लावली राष्ट्र सेवा समूहाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून ते या भागात काम करत असतात सामाजिक चळवळीत मोठा हातखंडा असलेला प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांची मोठी ओळख आहे मात्र यशवंतराव यांच्या विचाराने चालणाऱ्या पक्षाने प्रामाणिक आणि वैचारिक कार्यकर्त्याला सोडून गुंडाला उमेदवारी दिली हे अजित पवारांच्या नीतिमतेला पटणारे आहे का असा देखील सवाल कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.
राहुल पोकळे यांच्या पाठीमागे मोठा जनसमुदाय आहे त्यांना मानणारा वर्ग संख्येने खूप मोठा आहे सोसायटीतील नागरिकांशी वैचारिक पातळीवर राहुल पोकळे हे नेहमी अग्रेसर असतात याचा निश्चित फटका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बसेल असे देखील बोलले जात आहे.
