कुंभमेळ्याचा गाजावाजा; झाडाची कत्तल मात्र मुळशीत प्रशासन गप्प

मुळशी तालुक्यातील बांद्रे 72 झाडांची कत्तल; पर्यावरणाच्या मुळावर उठला पुण्यातील नामांकित बिल्डर

नांदविली डोंगरावर 400 ते 500 झाडांची कत्तल प्रशासन ढिसाळ

पौड (भरे)प्रशासनाकडून कुठलीही हालचाल नाही; वृक्षप्रेमी आक्रमक होण्याची शक्यता

मुळशी प्रतिनिधी – : (Tree cutting) सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवन परिसरातील झाडांची कत्तल करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला होता. या निर्णयाला वृक्षप्रेमींनी कडाडून विरोध दर्शवल्यानंतर आता महापालिका नमल्याचं दिसून येत आहे. मात्र

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौड परिसरातील बांद्रे या गावातील एका नामांकित बिल्डरच्या सांगण्यावरून 72 झाडाची कत्तल करण्यात आली आहे; याप्रकरणी अद्याप प्रशासनाने कुठलाही गुन्हा दाखल केला नसल्याचे दिसून येत आहे.

याप्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते संबंधित झाडे तोडणार यावर किती दंड प्रशासन मारेल किंवा पुढील काय कारवाई करेल हे येत्या काही दिवसातच समोर येईल.

नांदविली डोंगरावर 400 ते 500 झाडांची कत्तल प्रशासन ढिसाळ दंडाच

प्रशासन पैसे घेऊन गप्प; फॉरेस्ट डिपार्टमेंट पैसे घेऊन प्रकरण मिटवतात?

गेल्या काही दिवसांपूर्वीच एका नामांकित बिल्डरने रिसॉर्टसाठी अनेक झाडांची कत्तल केली मात्र प्रशासनाने देखील यावर कुठलीही कारवाई केली नाही असे देखील परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.

आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार पुण्यातील मोठ्या उद्योजकाच्या सांगण्यावरून कुठलीही परवानगी न घेता अनेक झाडांची वृक्षतोड करण्यात आली, असे त्यांचे शेतातील कामगार परिसरात सांगत आहेत? यामध्ये अनेक मोठी झाडे पाडण्यात आली, मात्र प्रशासन नेमके गप्प का यावर देखील आता वृक्षप्रेमी प्रश्न उठवताना दिसून येत आहेत. नेमका प्रशासनाने गुन्हा का दाखल केला नाही प्रशासनावर राजकीय कुठला दबाव होता का असा देखील सवाल यावेळी वृक्ष प्रेमींनी उपस्थित केला आहे.

मुळशी तालुक्यात अनेक ठिकाणी पर्यावरणीय नियमांकडे दुर्लक्ष करून मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल केली जात आहे.