खानापूर परिसर नांदेड सिटी विभागात समाविष्ट करण्याची मागणी
पुणे (ता. हवेली) : खानापूर परिसरातील नागरिकांना वीज वितरण कार्यालयाच्या गैरसोयीमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या हा भाग मुळशी विभागाशी जोडलेला असून संबंधित कार्यालय भरे (घोटावडे जवळ) येथे आहे. खानापूरपासून हे कार्यालय लांब अंतरावर असल्याने नागरिकांना तेथे जाणे कठीण होत आहे.
याशिवाय, त्या ठिकाणी जाण्यासाठी कोणतीही सोयीस्कर वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान, खानापूर परिसरात लोकवस्ती व व्यवसाय झपाट्याने वाढत असून रिंग रोडमुळे भविष्यात या भागाचा अधिक विकास अपेक्षित आहे.
या पार्श्वभूमीवर भविष्यात स्वतंत्र वीज वितरण कार्यालय सुरू करण्याची गरज व्यक्त होत आहे. तोपर्यंत खानापूर परिसराचा समावेश नांदेड सिटी विभागीय कार्यालयात करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
या संदर्भात संबंधित अधिकारी समवेत खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर निवेदन देण्यात आले असून लवकर निर्णय घेण्याची अपेक्षा शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मा.
श्री. नितीन वाघ, श्री. माऊली भगत श्री. रामदास गायकवाड, श्री. पप्पू गायकवाड श्री. तुषार गायकवाड
श्री. अजित पायगुडे व्यक्त करण्यात येत आहे.
