Pune update news – थंडीच्या मोसमात आजारांचा धोका जास्त असतो. कारण या ऋतूत बहुतेकांना सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. अशा परिस्थितीत हिवाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी काही गोष्टींचा आहारात समावेश करू शकता. पण हिवाळ्यात काही गोष्टींचे सेवन टाळावे.
हिवाळ्यात आहाराची पूरेपूर काळजी घ्यावीच लागते. बदलत्या वातावरणाने तुमची इम्युनिटी कमकुवत होऊ शकते. असे झाल्यास तुम्हाला कुठलाही आजार लवकर होऊ शकतो. तेव्हा हिवाळ्यात आहारात योग्य पदार्थ आहेत याची खात्री नक्की करून घ्यावी. हिवाळ्यात चुकूनही या गोष्टी खाऊ नका.
हृदय रोग असणाऱ्यांनी चुकूनही खाऊ नये हे पदार्थ
रेड मीट
हार्ट पेंशट्सने चुकूनही रेड मीट खाऊ नये. त्याने सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढेल. तुमच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
फास्ट फूड
हिवाळ्यात फास्ट फूड खाणे टाळा. फास्ट फूडमध्ये तेल आणि मसाल्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. ज्याने बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. फास्ट फूड खाल्ल्याने डायबिटीजचाही धोका वाढतो.
तेलकट पदार्थ
हिवाळ्यात तेलकट पदार्थ जसे की समोसा, पकोडे तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्ऱॉल वाढवण्यास कारणीभूत ठरते. तेव्हा हे पदार्थ हिवाळ्यात न खाल्लेलेच बरे.
गोड पदार्थ
थंडीच्या काळात काही वस्तू शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढवण्यास कारणीभूत ठरतात. चहा, कॉफी, आयस्क्रिम आणि पेस्ट्रीचे सेवन कमी करा.
