खांबोली, कातरखडक,आधाळे, रिहे खोरे गावातून पारखीनां उत्स्फूर्त प्रतिसाद
मुळशी प्रतिनिधी -: मुळशी पंचायत समितीच्या मतदानाचा दिवस जसा जसा जवळ येऊ लागला आहे, तसे उमेदवार देखील मोठ्या गाठीभेटी घेत नागरिकांशी संवाद साधत आहेत,
मुळशी पंचायत समितीची निवडणूक अनेक वर्षानंतर होत असल्याने माण पंचायत समिती गणात मोठी चुरस वाढली आहे, 69 माण पंचायत समिती गणनाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सौ. युगंधरा नवनाथ पारखी यांच्या नियोजनबद्ध प्रचारामुळे विरोधकांची मात्र चांगलीच डोकेदुखी वाढताना दिसून येत आहे,
खांबोली, कातरखडक,आधाळे, रिहे खोरे गावातून त्यांना चांगला मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.
काल गाव भेट प्रचारादरम्यान नागरिकांनी उत्कृष्टपणे मोठ्या प्रमाणावर मताधिक्य देण्याचा निर्धार देखील केला.
पारखी यांच्या नियोजनबद्ध प्रचारामुळे प्रचार यंत्रणेत ते यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे.
महिला सक्षमीकरण आणि विकासकामांचा अजेंडा
प्रचारादरम्यान युगंधरा पारखी यांनी प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या प्रश्नांना हात घातला आहे. ‘बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या हाताला रोजगार मिळवून देणे ही आपली प्राथमिकता असेल,’ असे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यासोबतच:
गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणे. वीज समस्या आणि अंतर्गत रस्ते सुधारणे. प्रशासकीय अनुभवातून गावचा सर्वांगीण विकास साधणे. ’आम्ही लोकांच्या समस्या जाणून घेऊन कामावर लक्ष केंद्रित करत आहोत. जनतेचा मिळणारा आशीर्वाद पाहता, माण पंचायत समिती गणातील भाजपाचा विजय निश्चित आहे,’ असा विश्वास यावेळी उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आला.
