Supriya Sule : एक पाऊस पडलाय अन् महाराष्ट्र पूर्णपणे पॅरालिसिसि झाल्याचे चित्र, सुप्रिया सुळेंचा सरकारावर हल्लाबोल;

पुणे मिसिंग लिंक’ (Missing Link) प्रकल्पाचाइतकागांजावाजाकरतकार्यक्रमझाला, ज्यामुळे अर्धा तास सगळ्यांचा वाचत होता, त्यामुळे सगळ्यांनीच त्याचे कौतुक केलं . सध्या कॉस्ट मध्ये पडायला नको कारण तो वेगळा विषय आहे . मात्र ज्या पद्धतीने मिसिंग लिंकचे (Mumbai Pune Missing Link Land Slide) व्हिडीओ येतोय हे अतिशय चिंताजनक आहे . राज्यात या पूर्वी ही पाऊस झाला आहे . मुंबई – पुण्याला पाऊस नवा नाही . पण असं चित्र पूर्वी नव्हतं . हे कदाचित पहिल्यांदाच पाहायला मिळत असून हे अतिशय चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे . महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यां नी तातडीने आढावा घेऊन राज्यात आणीबाणी (Emergency) जाहीर करावी . महाराष्ट्रा चे नेमकं चित्र काय ? यावर देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी भाष्य करणं अतिशय आवश्यक असल्याचे ही त्या म्हणाल्या . राज्यात एक पाऊस पडलाय आणि महाराष्ट्र पूर्णपणे पॅरालिसिसि झाल्याचे चित्र सर्व माध्यमांमधून दिसत आहे.

आज तुम्ही पुण्याच रेल्वे स्थानक, एसटी बस आगार बघा, हे समजू शकतो. मात्र मुंबई-पुणे यांच्यातील कनेक्टिव्हिटी अतिशय महत्त्वाची असून ही कनेक्टिव्हिटी बंद होणं, हे धक्कादायक आहे. मुंबईत अधिवेशन सुरू असताना आमदार तेथे पोहोचतील की नाही ही परिस्थिती आहे. जर आमदार निघाले नसतील तर माझी त्यांना विनंती आहे की रिक्स घेऊन घराबाहेर पडू नका. लोकप्रतिनिधी आमदार,खासदार जर पोहचू शकत नसतील तर सर्वसामान्य माणसांचं काय? मुंबई-पुणेला जोडणाऱ्या तीन मार्ग असून तीनही सध्याघडीला बंद असल्याचे चित्र असून अशी परिस्थिती चिंताजनक असल्याचेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना विनंती आहे की या दिवसात शक्य तेवढा प्रवास टाळावा. तर दुसरीकडे माझी आग्रही मागणी आहे की महाराष्ट्रातील सर्व इनफास्ट स्ट्रक्चरची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. सगळ्या प्रकाराला करप्शन म्हणणार नाही कारण की त्या संदर्भात अद्याप माहिती आलेली नाही. मात्र या इनफा स्ट्रक्चर मध्ये एकूण किती खर्च झाला, सेफ्टी संदर्भात ऑडिट झाला का, आणि जर झाला असेल तर या नैसर्गिक आपत्ती संदर्भात विचार केला की नाही? सर्व प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्र सरकारला द्यावी लागणार असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.