Sinhagad Village Audit: घेरा सिंहगड ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहारावर चौकशीची मागणी

Pune ऐतिहासिक सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या घेरा सिंहगड (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या कारभाराची आणि मागील पाच वर्षांत झालेल्या विविध विकासकामांची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी नागरिक सूर्यकांत सांबरे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून तसेच माहितीच्या अधिकारातून माहिती मागूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

सन २०२२ ते २०२६ या कालावधीत घेरा सिंहगड ग्रामपंचायतीकडे विकासकामांसाठी व विविध माध्यमांतून प्राप्त झालेल्या निधीच्या खर्चामध्ये आणि ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून करण्यात आलेल्या खर्चात लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा संशय सांबरे यांनी व्यक्त केला आहे. या संपूर्ण आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.

पारदर्शकतेची मागणी आणि उपोषणाचा बडगा

विकासाच्या नावाखाली करण्यात आलेल्या कामांमध्ये तसेच ग्रामपंचायतीकडे आलेल्या विविध निधीच्या वापराबाबत पारदर्शकता असणे आवश्यक असल्याचे सांबरे यांनी म्हटले आहे. संबंधित आर्थिक व्यवहार, विकासकामांची बिले, मंजुरी, प्रत्यक्ष कामांची स्थिती आणि निधीचा वापर यांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने आपण उद्विग्न झालो असून, मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी २९ सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचे सूर्यकांत सांबरे यांनी स्पष्ट केले आहे.