पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची आज निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रसचे एकहाती सत्ता असलेल्या या जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या नेत्याला मिळणार याची उत्सुकता होती.
अखेर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दौंड तालुक्याच्या वाट्याला गेले. वीरधवल जगदाळे यांची अध्यक्ष म्हणून तर, उपाध्यक्ष म्हणून विवेक वळसे पाटील (आंबेगाव) यांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. त्यामुळे हा नेत्यांची निवड केवळ आता औपचारिकता राहिला आहे.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान अजित पवारांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व पुन्हा एकदा दाखवून दिले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून अध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार याची चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही उमेदवार हे घड्याळ चिन्हावर लढले होते. त्यामुळे या पक्षातील कोणत्या नेत्याला संधी मिळणार याची देखील चर्चा.
गटनेतेपदी ढोले
राष्ट्रवादी काँग्रसेने आपल्या गटनेते पदी इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांची निवड केली होती. त्यामुळे अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, पक्षातील नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले होते की गटनेते पदी निवड झालेला नेता अध्यक्ष होईल, असे नाही. त्यामुळे ढोले यांना अध्यक्ष पद मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते.
