मुंबई प्रतिनिधी-: दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. त्याअगोदर पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात एक मोठा राजकिय भूकंप झाल्याने मुळशीच्या राजकारणाला एक कलाटणी मिळणार आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनेक आजी माजी पदाधिकाऱ्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी ( दि. १३) मुबंई पक्षकार्यालयात शेकडो जणांनी पक्ष प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी कमळ हाती घेतलं आहे.
मोठ्या प्रमाणावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केल्याने हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चबांधणीला सुरुवात केली असून भाजपने देखील स्थानिक पातळीवर प्रत्येक तालुक्यात लक्ष केंद्रीत केले आहे.
प्रवेश केलेल्यांमध्ये राष्ट्रवादीचे मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती पांडुरंग ओझरकर, माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती हुलावळे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमित कंधारे, पीएमआरडीएचे सदस्य सुखदेव तापकीर, अजित पवार गटाचे भोर विधानसभा माजी अध्यक्ष सुरेश हुलावळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पांडुरंग राक्षे,अमृता हिंगडे यांचा समावेश आहे.
पक्ष प्रवेशावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार संग्राम थोपटे, प्रसाद लाड, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, कार्यालय सहसचिव भरत राऊत, तालुकाध्यक्ष हनुमंत चव्हाण, गंगाराम मातेरे, शिवाजीराव बुचडे, राजाभाऊ वाघ, तानाजी हुलावळे, विनायक ठोंबरे, दादाराम मांडेकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संदीप साठे, वैशाली सणस ,राहुल शेडगे,रमेश सणस, दत्तात्रय गाढवे, सविता गवारे , जीवन साखरे, शरद जांभूळकर , विशाल साखरे, युवराज पायगुडे, आदी उपस्थित होते.
ज्या कार्यकर्त्यांनी विश्वासाने पक्षप्रवेश केला त्या विश्वासास पात्र ठरण्याचा प्रयत्न आम्ही करू, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावेळी दिली. तर माजी आमदार संग्राम थोपटे म्हणाले राज्य प्रगतीपथवावर नेण्यासाठी स्थानिक पातळीवर मोठा जनसंपर्क असलेले हे कार्यकर्ते असल्याने नव्या जुन्याचा मेळ घालून भारतीय जनता पक्ष वाटचाल करील. या पक्ष प्रवेशासाठी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संदीप साठे यांनी विशेष प्रयत्न केले.
प्रवेश केलेल्यांमध्ये सरपंच श्रीकांत तापकीर (मूलखेड) धनंजय बोडके ( रिहे) ,मोरेश्वर घारे (पिंपोळी) ,अशोक ओव्हाळ( चांदे) हिंजवडीचे माजी सरपंच विक्रम साखरे, उपसरपंच शशिकांत धुमाळ, राजू जाधव (नेरे) कातरखडकचे उपसरपंच योगेश पापळ, भूषण बोडके, माजी उपसरपंच रवि बोडके, पंडित गवारे, ललित शिंदे, सुनील जाधव, गुलाब लेणे, भास्कर जाधव, संभाजी जाधव, तुकाराम जाधव, तुकाराम भोईर, बाळासाहेब बालवडकर, जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस ( शप गट) निलेश भोईर, आत्माराम भोईर, शंकर भोईर, सोमनाथ भोईर मारुंजीचे मा.सरपंच ईश्वर बुचडे,नवनाथ बुचडे, माण सोसायटी चेअरमन बापू भोसले, विलास गवारे, अर्जुन पारखी, भरत बोडके, राजू पारखी,पोपट पारखी, प्रसाद तापकीर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
