पुणे प्रतिनिधी -: पुणे जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी मुळशीचे शिवाजी बुचडे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरली मोहोळ, संघटनमंत्री राजेश पांडे, आमदार राहुलदादा कुल, माजी आमदार संग्राम थोपटे यांनी या निवडीवर शिक्कामोर्तब केले आहे. भारतीय जनता पक्षाने पदाधिकारी निवडीतही आपले ‘धक्कातंत्र’ कायम ठेवले आहे. पक्षाच्या गटनेतेपदी माण हिंजवडी गटातून विजयी झालेले शिवाजी बुचडे पाटील यांची अनपेक्षित नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड १८ मार्च रोजी होत आहे. मात्र अध्यक्ष निवडीनंतर सर्वसाधारण सभा बोलावण्यासाठी आवश्यक असलेला किमान १२ दिवसांचा कालावधी उपलब्ध होत नसल्याने अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी प्रशासकांवर आली आहे.
अर्थसंकल्प सादर करून त्याच्या मंजुरीसाठीचे सूचना पत्र काढण्यात आले. अध्यक्ष निवडीनंतर त्यांच्या अधिकारात सर्वसाधारण सभा बोलावली जाईल. त्या सभेत हा अर्थसंकल्प अवलोकनार्थ सभेपुढे ठेवण्यात येणार आहे.
*भाजपाचे धक्कातंत्र कायम; दिली अभ्यासू नेतृत्वाला संधी*
माण हिंजवडी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारंपारिक मतदारसंघातून भाजपाच्या शिवाजी बुचडे पाटील यांनी आमदार शंकर मांडेकर यांच्या होमपेचवर राष्ट्रवादीचा पराभव केला बुचडे यांच्याकडे अभ्यासू नेतृत्व म्हणून पाहिले जाते.
