आर्किटेक व उच्चशिक्षित असलेल्या मिलिंद वाळुंज यांची बांधकाम सभापतीपदी वर्णी लागण्याची शक्यता? सूत्रांची माहिती
पुणे प्रतिनिधी -: पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडीत यंदा मोठी चुरस पाहायला मिळाली, अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या मतदारसंघाला प्रतिनिधित्व मिळावे यासाठी जोरदार प्रयत्न केले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी दौंड तालुक्यातील वीरधवल जगदाळे यांची वर्णी लागली तर उपाध्यक्षपदी आंबेगाव तालुक्यातील विवेक वळसे पाटील यांची वर्णी लागली.
आमदार शंकर मांडेकरांकडून नवख्या चेहऱ्यांना संधी?
पुणे जिल्हा परिषदेच्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या बांधकाम सभापतीपदी पौड अंबडवेट जिल्हा परिषद गटातून प्रथमच निवडून आलेले मिलिंद वाळुंज यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे,
भोर राजगड मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांनी माजी आमदार संग्राम थोपटे यांना मोठा धक्का देत तिन्ही तालुक्यावर आपले वर्चस्व सिद्ध केले, याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेचे अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या बांधकाम सभापतीपदी उच्चशिक्षित आर्किटेक उद्योजक असलेल्या मिलिंद वाळुंज यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे,
भोर वेल्हा मुळशीच्या विकासासाठी आपल्या विश्वासू समर्थकाची निवड झाल्यास त्यांना निधीसाठी अडचण येणार नाही सूत्रांच्या माहितीनुसार यामुळेच नवनर्वाचित जिल्हा परिषदेचे सदस्य मिलिंद वाळंज यांची सभापतीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
