Manoj Jarange Patil vs ramdas Kadam shivsena shinde 500 cr मी लेचापेचा नाही. मनोज जरांगे यांनी रामदासभाईंचं चँलेज स्वीकारलं, थेट लायकीच.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अखेर डिवचलंच. या नाराजीचं कारणंही त्यांनी भरसभेत सांगितलं.

आपल्या नावावर 500 कोटी रुपये कोणी घेतले असा सवाल त्यांनी विचारला. त्यानंतर शिंदे सेनेचे शिलेदार जरांगे पाटील यांच्यावर तुटून पडले. रामदास कदम यांनी तर त्यांच्यावर ना ना आरोप केले. रामदासभाईंचे हे आवाहन जरांगे पाटलांनी स्वीकारले आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यानंतर राज्यात राजकीय शिमगा सुरू झाल्याचे चित्र आहे.

मी लेचापेचा नाही

शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांना मनोज जरांगे पाटील यांनी थेट इशारा दिला. माझं काही वाकडं करू शकत नाहीत, मला उद्ध्वस्त करणं सोपं नाही. एवढे आम्ही लेचेपेचे नाहीत, असा खणखणीत इशारा जरांगे यांनी दिला. औकात काय आहे काय नाही हे उद्या सांगतो. आम्ही औकात कोणाची वाढवली सांगतो. मी एवढंच विचारतोय पाचशे करोड रूपये मला दिले की नाही ते सांगा. हो म्हणा किंवा नाही म्हणा. औकात काय असते ते दिसणार आहे, असे जरांगे म्हणाले.