pune भोर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमध्ये रिक्त झालेल्या ९ थेट सरपंच पदांसह ३४ सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी २८ एप्रिल रोजी मतदान होणार असून, २९ एप्रिल रोजी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाईल.
भोर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामधील ९ थेट सरपंच आणि ३४ सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. याचं सविस्तर वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. (Pune gram panchayat by-election 2026 full schedule)
पुण्याच्या भोरमध्ये ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा बिगुल वाचले आहे. भोर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमधील रिक्त असलेल्या ९ थेट सरपंच आणि ३४ सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी २८ एप्रिलला मतदान होणार आहे, तर २९ एप्रिलला निकाल जाहीर केला जाणार आहे. निधन,राजीनामा आणि इतर कारणांमुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. त्याच्या निवडणुका जाहीर करण्यात आली आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार, ३० मार्चला तहसीलदारांकडून नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर ७ ते १३ एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येतील.१५ एप्रिलला अर्जाची छाननी होईल, तर १७ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे..२८ एप्रिलला प्रत्यक्ष मतदान आणि २९ एप्रिलला मतमोजणी होईल, असे सांगण्यात आले आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा भोर मधील भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. मागील काही निवडणुकांमध्ये भाजपचे नेते आणि माजी आमदार संग्राम थोपटे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर असा राजकीय संघर्ष रंगाचा पाहायला मिळाला आहे.
थोपटेंचा बालेकिल्ला असलेल्या भोरमध्ये गेल्या काही निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने थोपटे स्थानिक पातळीवरचा आपला वर्चस्व पुन्हा दाखवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
