भाजपाच्या शिलेदारांना केमसेवाडी, कटार खडक, खांबोली, पिंपळोली, गवारेवाडी, जवळगावात, गवारेवाडी, पडगळवाडीत, ओझरकरवाडी, रिहे गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
हिंजवडी वार्ताहर -: पुणे जिल्हा परिषद व मुळशी पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर माण हिंजवडी जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार शिवाजी बुचडे पाटील यांनी आज केमसेवाडी, कटार खडक, खांबोली, पिंपळोली, गवारेवाडी, जवळगावात, गवारेवाडी, पडगळवाडीत, ओझरकरवाडी, रिहे गावात ‘हाऊस टू हाऊस’ प्रचार करून प्रचाराचा धडाका उडवून दिला.
त्यानंतर केमसेवाडी येथील रामेश्वर मंदिर येथे ‘संवाद दौरा’ उत्साहात पार पडला ग्रामस्थांनी मनमोकळेपणाने आपली मते, समस्या व अपेक्षा मांडल्या.
यावेळी ग्रामस्थांनी दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता, हिंजवडी जिल्हा परिषद गटात आता परिवर्तनाचे वारे वाहू लागल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
यावेळी केमसेवाडी, कटार खडक, खांबोली, पिंपळोली, गवारेवाडी, जवळगावात, गवारेवाडी, पडगळवाडीत, ओझरकरवाडी, रिहे गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “गावचा विकास आणि तालुक्याची प्रगती केवळ आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या नेतृत्वाखालीच शक्य आहे,” असा विश्वास व्यक्त करत ग्रामस्थांनी शिवाजी बुचडे यांना भरघोस मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार केला आहे.
