टँकर लॉबी नष्ट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना विजयी करा अमोल कोल्हे
येवलेवाडी प्रतिनिधी -:: पुणे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून, या जाहीरनाम्यात पुणेकरांसाठी मोठ्या प्रमाणावर लोकहिताचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत.
यामध्ये सर्वांसाठी मोफत मेट्रो आणि पीएमपीएमएल बस सेवा, पाणीपुरवठा सुधारणा, मालमत्ता कर सवलत, आरोग्य-शिक्षण सुविधा, झोपडपट्टी पुनर्वसन आणि रस्ते विकास अशा महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे.
पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा जाहीरनामा अलीकडेच प्रसिद्ध करण्यात आला आहे. निवडणूक प्रचाराला वेग येत असतानाच राष्ट्रवादीने हा व्यापक विकास आराखडा मांडला आहे.
आज कोंढवा बुद्रुक येवलेवाडी कात्रज प्रभाग क्रमांक 11 च्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज खासदार अमोल कोल्हे यांनी योगेश टिळेकर यांचे नाव न घेता सळसडून टीका केली, यावेळी ते म्हणाले की 2017 साली, 24 तास पाणी देऊ म्हणून सत्तेत आले मात्र या भागाला वंचित ठेवण्याचे काम यांनीच केले व टँकर लॉबीला पोहोचण्याचे काम आमदार टिळेकरांनी केले असा टोला यावेळी त्यांनी लगावला.
या भागाचा खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आहे आमदार देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आहे व प्रभाग क्रमांक 40 मधील नगरसेवक सुद्धा राष्ट्रवादीचे होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला व गंगाधर अण्णा बधें, बाळा उर्फ सुरेश कवडे, मार्कड वर्षा सतीश, धर्मावत सपना अमोल यांना विजयी करण्याचे आव्हान केले.
