हडपसर प्रतिनिधी -:: पुणे महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपली आहे शिवसेनेने सर्वच पुणे शहरात उमेदवार दिल्याने महायुतीत मात्र मोठी रंगत आली आहे,
प्रभाग क्रमांक 41 च्या निवडणुकीच्या दरम्यान शिवसेनेचे शहरप्रमुख तथा उमेदवार प्रमोद उर्फ नाना भानगरे यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे,
यावेळी आमच्या प्रतिनिधीने नाना भानगिरे यांना विचारले असता ते म्हणाले की पुण्याचा महापौर शिवसेनेचाच होईल राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच नगर विकास मंत्री आहेत त्यामुळे निश्चित पुणे शहराला ते भरभरून देत आले आहेत ते मुख्यमंत्री असताना पन्नास वर्षात जे प्रश्न सुटले नव्हते ते शिंदे साहेबांनी सोडवले आहेत
लाडक्या बहिणीच्या मदतीने पुणे शहरात शिवसेनेचा महापौर होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पुणे महापालिकेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढत असून कार्यकर्ते व पदाधिकारी ताकदीने कामाला लागले आहेत, त्यामुळे विजय आमचाच होणार, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पुणे हे महाराष्ट्राचे चैतन्य आणि विद्येचे माहेरघर असल्याचे सांगत, अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या पुणे महापालिकेला विकासाचे अमृत देण्याची गरज असल्याचे भानगिरे म्हणाले. आमचा अजेंडा सत्ता नाही, तर विकास आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवणारा विकास हाच शिवसेनेचा झेंडा आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीत विकासाभिमुख व लोककल्याणकारी निर्णय घेतल्याचा दाखला देत त्यांनी चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडवल्याचा अनुभव सांगितला आणि कात्रजची वाहतूक कोंडीही दूर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा शब्द दिला.
