कात्रज प्रतिनिधी – : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३८ बालाजी नगर – आंबेगाव – कात्रज मधील भाजप-आरपीआय महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारात चांगला जोर दिसून येत आहे.
पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचा महापौर होईल आपल्या भागाच्या विकासासाठी प्रभाग क्रमांक ३८ बालाजी नगर – आंबेगाव – कात्रज मधील पाचही उमेदवारांना मोठ्या बहुमताने विजय करावे असे आव्हान खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी केले.
यावेळी ते म्हणाले की राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली राज्य पुढे जात आहे आपल्याला पैशाची कमतरता कमी भासणार नाही मेट्रो शहरांमध्ये कात्रज धनकवडी आंबेगाव हे देखील पुढे असणार आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अश्विनी चिंदे, संदीप बेलदरे,राणी भोसले, प्रतिभा चोरघे, व्यंकोजी खोपडे यांना आपले बहुमूल्य मत देऊन मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले.
भाजपा-आरपीआय महायुतीच्या पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभताना पाहायला मिळत आहे. या प्रभागातील भाजप-आरपीआय महायुतीच्या उमेदवारांच्या पदयात्रेबाबत निवडणुकीच्या वर्तुळात सकारात्मक चर्चा ऐकायला मिळत आहे.
