Pune दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ असे नेहमी म्हटल्या जाते. मराठी माणसांनी दिल्लीचे तख्त अनेकदा हादरवलेच नाही तर सत्ताधीशांना झुकवले याचे इतिहासात दाखले मिळतात.
या एका तपात तर दिल्लीला मराठी माणसाने दोनदा झुकवल्याचे दिसून येते. तख्तालाही मोठे हादरे दिले. 2011 मध्ये अण्णा हजारे यांच्यामुळे काँग्रेसची सत्ता गेली आणि भाजपची केंद्रीय सत्ताकारणात पुन्हा एंट्री झाली. तर आता अभिजीत दिपके यांच्या CJP च्या आंदोलनामुळे इतिहास घडला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची विकेट पडली. सरकार अगोदर त्याचा राजीनामा घेण्यास अनुकूल नव्हते. पण दिपके भिडले, लढले आणि जिंकले. अवघ्या दोन महिन्यांच्या त्यांच्या पक्षाने सिस्टिम हादरवली. भाजप सरकारला त्यांची मागणी मान्य करावी लागली.
अण्णा हजारे यांचे आंदोलन कशासाठी?
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गेल्या दशकातील जंतरमंतरवरील आंदोलन देशभरातच नाही तर जगभरात गाजले. भ्रष्टाचारासह लोकपालासाठी त्यांनी आंदोलन केले. भ्रष्टाचाराविरोधात जंतरमंतरवर त्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर लोकांचा पाठिंबा मिळाला होता. 2011 मध्ये आंदोलन पेटले होते. या आंदोलनातून आप पक्षाचा जन्म झाला. अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया आणि इतर अनेक नेते भारतीय राजकारणात आले. तत्कालीन काँग्रेस सरकारला हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळा बाबा रामदेवही प्रसिद्ध झाले. या आंदोलनाने देशभरात काहूर उठले.
या आंदोलनाचा फटका काँग्रेसला 2014 मधील निवडणुकीत बसला. भाजप केंद्रात सत्तास्थानी आली. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले. अण्णा हजारांचे आंदोलनाला कुणाचा पाठिंबा होता आणि या आंदोलनामागे कोण होते यावरून आजही टीका होते. काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचाराचा आरोप झाला. पण पुढे त्या आरोपाचे काय झाले हा सवाल आजही विचारला जातो. पण अण्णा हजारे यांच्या आंदोलनाने देश एका मुद्दावर एकसंघ झाल्याचे दिसून आले. अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळेच काँग्रेस सत्तेबाहेर फेकल्या गेल्याचे मानले जाते.
