बाणेर प्रतिनिधी (Pune update news ) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, बालेवाडीगाव, भैरवनाथ मंदिर सुसगाव, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील जनसंपर्क कार्यालय, पाषाण सुतारवाडी लिंक रोड MSEB कार्यालयाजवळ, भारतीय जनता पार्टी उत्तर मंडल कोथरूडचे अध्यक्ष लहू बालवडकर यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
“एक थेंब रक्ताचा, वाचवेल जीव मोलाचा!” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली सकाळी १० ते रात्री १० या वेळेत झालेल्या शिबिरात बाणेर बालेवाडी, सुसगाव, पाषाण सुतारवाडी लिंक रोड, परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या या शिबिरामध्ये 1014 पिशव्या रक्त संकलित करण्यात आल्या.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या शुभहस्ते झाले.
या रक्तदान शिबिराला महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे, पुणे शहर महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदाताई फंरादे, पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस पुनीतदादा जोशी, पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष गणेश कळमकर, रविंद्रभाऊ सावळेकर, राघवेंद्र बापु मानकर, माजी नगरसेवक सुशिल दादा मेगंडे, ज्येष्ठ नेते प्रकाश बालवडकर, प्रल्हाद सायकर, यांनी रक्तदान शिबिराला भेट दिली.
भारतीय जनता पार्टी कोथरूड विधानसभा उत्तर मंडलचे सर्व पदाधिकाऱ्यांनी संयोजनाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली, आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.