जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सर्वात मोठी अपडेट

Pune स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकातील नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडले आहे. त्यानंतर काही रखडलेल्या नगरपालिका निवडणुकीसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे.

दुसरीकडे आरक्षणामुळे रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सर्वात मोठी अपडेट पुढे आली आहे. राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात घेण्याच्या विचारात आहे.त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात घेण्याच्या विचारात आहे. 50 % आरक्षण मर्यादेच्या मुद्द्यावरून हा निर्णय होऊ शकतो. सुरुवातीला 15 जिल्हा परिषदांमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे, तर उर्वरित 17 जिल्हा परिषदांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या 21 जानेवारीच्या सुनावणीनंतर दुसऱ्या टप्प्यात निवडणुका होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्यामुळे आयोगाने आता दुसऱ्या टप्प्यात महापालिकांची निवडणूक घेण्याचे नियाजन केले आहे. मात्र, त्यासाठी १० डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे. त्या दिवशी महापालिकांची वॉर्डनिहाय मतदार यादी अंतिम होणार आहे. आयोगाकडून १० डिसेंबर रोजी त्यासंदर्भात आढावा घेतला जाईल. त्यानंतर दुसरा टप्पा जाहीर केला जाईल, असे आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.