भोर-राजगड-मुळशी मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्तांना न्याय मिळावा; नुकसानग्रस्त रस्त्यांच्या पंचनाम्यांसह विशेष निधीची आमदार शंकरराव मांडेकरची मागणी

पुणे, दि. ८ जुलै : भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक रस्ते, पूल आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांची हानी झाली आहे.

या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळावी तसेच नुकसानग्रस्त रस्त्यांचे त्वरित पंचनामे करून त्यांच्या दुरुस्तीसाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भोर राजगड मुळशीचे आमदार श्री. शंकर मांडेकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार तसेच महसूलमंत्री मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर करत त्यांनी मागणी केली आहे.

या निवेदनामध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीची आर्थिक मदत, नुकसानग्रस्त रस्ते व पुलांचे पंचनामे, दुरुस्तीसाठी विशेष निधी मंजूर करणे तसेच जनजीवन पूर्ववत करण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी आमदार शंकर मांडेकर यांनी सांगितले की, “मतदारसंघातील नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून अतिवृष्टीग्रस्तांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुमित्रा वहिनी यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दाखवत तात्काळ अधिकाऱ्यांना सचिवांना सूचना दिलेल्या आहेत.