आणखी एका बड्या नेत्याचं मंत्रिपद जाणार? रोहित पवारांनी थेट नाव

Pune राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांच्याकडे असलेल्या क्रीडा खात्याचा कारभार काढून घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे तशी शिफारस केली होती.

मंत्री कोकाटे यांचा राजीनामा म्हणजे निसटण्याचे सगळे मार्ग संपल्याने नाईलाजाने घेतलेला हा निर्णय आहे. वास्तविक नैतिकतेच्या आधारावर कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा ठोठावली तेव्हाच त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता किंवा सरकारने तरी त्यांचा राजीनामा घेऊन सरकार खऱ्या अर्थाने ‘वेगवान’ आहे हे दाखवून द्यायला हवं होतं. यामुळं किमान कायद्याचा सन्मान तरी राखला गेला असता आणि ‘कायदा व न्याय हे सर्वांसाठी समान आहे,’ असा चांगला संदेशही समाजात गेला असता, असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले. तसेच माणिकराव कोकाटे यांच्याकडून करणंच चुकीचं आहे, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. पुढे बोलताना त्यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे नाव घेऊन खळबळ उडवून दिली आहे. या राजीनाम्यातून अनेकजण धडा घेतील, ही अपेक्षा आहे. आम्ही मात्र मंत्री शिरसाठ यांच्याही विकेटची वाट पहात आहोत, असे पवार म्हणाले आहेत. रोहित पवार यांच्या या ट्वीटने एकच खळबळ उडाली आहे.