Pune update उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर आणि पुण्यातील नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांच्यातील वाद अद्याप थंडावलेला नाही.
रुपाली ठोंबरे पाटील यांचा राजीनामा
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या गेल्या काही काळापासून पक्षात नाराज असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता यांनी NCP शहर कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांनी दोन दिवसांपूर्वीच राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यांचा राजीनामा पक्षाकडून अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. यावर अजित पवार पक्षश्रेष्ठी नेमका काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रवक्तेपदावरून उचलबांगडी…
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी पोलिसांची बाजू घेतली होती. त्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी देखील चाकणकर यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर काही दिवसांनी पक्षाने रुपाली ठोंबरे पाटील यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी केली होती. या सर्व घडामोडीनंतर रुपाली ठोंबरे पाटील नाराज असल्याचे बोलले जात आहे.
