Pune MPsc अन्नत्याग आंदोलनाने यश मिळणार नाही. पैलवान मैदानात उतरणार असेल तर सशक्त असले पाहिजे. यानुसार आंदोलन सुरू ठेवा. लंगर चालवून गुरू नानकदेव यांनी समाजात बदल घडवला.
तेव्हा खाऊन पिऊन लढा द्या. भीमनवार यांना राजीनामा द्यावाच लागेल, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिला.
एस. एम. जोशी पूल येथे सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या बेमुदत आंदोलनात शुक्रवारी (दि. ९) ते बोलत होते. टिकैत म्हणाले की, शेती तोट्यात नसते, तर तिला तोट्यात ढकलली जात आहे. कारण, व्यापाऱ्यांचा डोळा तुमच्या शेतीवर आहे. तेव्हा कुठेही नोकरी करा पण शेती विकू नका. विद्यमान सरकारने शेतकऱ्यांना १३ महिने रस्त्यावर बसवून ठेवले. आम्ही ३० लाख लोक होतो.