pune राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे, अभिनेत्री दिपाली सय्यद, संगीता तिवारी, आशा मिरगे, हनुमंत गलगटे यांच्यासह इतरांचा समावेश आहे.
पुण्यात गुन्हा दाखल
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर या अडचणीत आल्या होत्या. त्यामुळे त्यांना राज्य महिला आयोगाचा राजीनामा द्यावा लागला होता. रुपाली चाकणकर या खरातच्या संपर्कात असल्यानं त्यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात होती. या प्रकरणात आपल्याला अडकवण्यात आले असून आपली बदनामी झाल्याचा आरोप रुपाली चाकणकर यांनी केला होता.

त्यांची बदनामी केल्याप्रकरणी १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली चाकणकर यांच्याकडून काही दिवसांपूर्वी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांकडून आज १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या सर्वांवर काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अशोक एकनाथ खरात यांच्याशी त्यांची ९ वर्षांपूर्वी एका सामाजिक कार्यक्रमात ओळख झाली होती. मंदिराच्या धार्मिक कार्यक्रमानिमित्त मी तिथे जात होती. १८ मार्च २०२६ रोजी खरात यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाल्याचे प्रसार माध्यमांमधून समजले. त्यानंतर खरात यांच्यासोबत सामाजिक कार्यक्रमातील फोटो वापरून माझ्यावर आरोप करण्यात आले.