Pune महाराष्ट्र सरकारने सामाजिक समता आणि सर्वसमावेशकतेच्या दिशेने एक अत्यंत ऐतिहासिक आणि महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील तृतीयपंथीय समुदायाला आर्थिक आणि सामाजिक बळ देण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसमधून आता तृतीयपंथीय व्यक्तींना मोफत प्रवासाची सुविधा अधिकृतपणे लागू करण्यात आली आहे.
एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये या मोफत प्रवासाच्या सुविधेचा गैरवापर टाळण्यासाठी आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर केला जाणार आहे. (ST bus)
परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, १ सप्टेंबर २०२६ पासून या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ म्हणजेच एनसीएमसीस्मार्ट कार्ड वापरणे पूर्णपणे अनिवार्य असेल. आता महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या धर्तीवर तृतीयपंथीय व्यक्तींनाही हक्काचा आणि मोफत प्रवासाचा अधिकार मिळाला आहे. (ST bus)
