Pune दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. गेल्या १० मिनिटांपासून दोघांमध्ये चर्चा सुरु आहेत.
विरोधकांकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीकडून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता विरोधकांनी पाठिंबा दिला आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवशेनामध्ये विरोधकांकडून सातत्याने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. विरोधकांच्या गदारोळानंतर गेल्या २ दिवसांपासून लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब केले जात आहे. दोन्ही सभागृहाचे काम सुरळीत होत नाही. या संपूर्ण प्रकरणानंतर किरण रिजेजू यांनी लोकसभेत भूमिका मांडली की नीट पेपर फुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर धर्मेंद्र प्रधान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या भेटीला गेले आहेत. आता या चर्चेनंतर सरकार पुन्हा चर्चा करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
