Pune Police Transfer: पुणे अपडेट’च्या वृत्ताची दखल; बंडगार्डन पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांची अखेर बदली

Pune News बंडगार्डन पोलिस ठाण्यास नेमणुकीस असलेल्या त्या दोन कारभाऱ्यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या बाबतचे आदेश दिले आहेत. तुळापूर येथील प्रोजेक्ट एक्स पार्टीला त्या कारभाऱ्यांची हजेरी वृत्त प्रसिद्ध करून याबाबत लक्ष वेधले होते.

याच वृत्ताची दखल घेत या दोन कारभाऱ्यांची बदली केली आहे. एकाला डेक्कन तर दुसऱ्याला खडकी पोलिस ठाण्यात नेमणूक देण्यात आली आहे.

पोलिस दलातील कथीत वसुलीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अलिकडच्या काळात अनेक पोलिस कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करत कठोर भूमिका घेतली आहे. मात्र, त्याच वेळी बंडगार्डन पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या या दोन पोलिस कर्मचाऱ्यांची कोथरूड पोलिस ठाण्यात झालेली बदली रद्द करून त्यांना पुन्हा एक वर्षासाठी बंडगार्डन पोलिस ठाण्यातच मुदतवाढ दिली होती. मात्र, आता त्या दोघांची मुदतवाद रद्द करून बदली केली आहे.