MSEDCL : तुमचं मिटर 48 तासांमध्ये बदलणार, ‘महावितरण’कडून आला का तुम्हाला मेसेज?

Pune News उन्हाळ्यामध्ये विजेचा वापर वाढत चालला आहे. ग्रामीण भागामध्ये लोडशेडिंगचं प्रमाणही वाढलं आहे. अनेक भागांमध्ये विज खंडित होण्याचे प्रकार वाढत आहे. त्यामुळे लोकांनी महावितरणच्या दारात आंदोलन करण्याची वेळ आली.

एकीकडे सेवेच्या नावाने बोंबाबोब असताना आता महावितरणकडून ग्राहकांना अल्टीमेटम दिला जात आहे. 48 तासांमध्ये स्मार्ट मिटर बदलून दिले जाणार, असा मॅसेज थेट व्हॉट्सअपवर पाठवला जात आहे.

महावितरणकडून सध्या ग्राहकांना मेसेज पाठवले जात आहे. स्मार्ट मिटर बदलले जाणार असं सांगितलं जात आहे. या मेसेजमध्ये जर तुमचे मीटर ‘स्मार्ट मीटर’ नसेल, तर हा संदेश मिळाल्यापासून ४८ तासांनंतर MSEDCL (महावितरण) किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींद्वारे तुमचे सध्याचे मीटर बदलून त्याऐवजी ‘स्मार्ट मीटर’ बसविण्यात येणार आहे, असं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, यासाठी कोणतीही शुल्क महावितरणने आकारले नाही. पण, पुढे काही दर आकारले जाणार आहे का, याबद्दल कोणतीही माहिती महावितरणने दिली नाही.

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचं काय?

विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कुठेही बळजबरीने महावितरणकडून स्मार्ट मिटर बसवले जाणार नाही, असं आश्वासन दिलं होतं. पण, असं असताना आता महावितरणकडून ग्राहकांना थेट मेसेज पाठवले जात आहे.