सुनेत्रा पवार यांचा तडकाफडकी शरद पवार यांना फोन, राजकारणात मोठी खळबळ; नेमकं काय घडतंय?

Pune

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. एकूण सतरा जागांसाठी ही निवडणूक होत आहे. परंतु यावेळी महायुती आणि माहविकास आघाडीमध्ये अनेक जागांवर बंडखोरी झाली आहे.

बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी वरिष्ठांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. विशेष म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक नेत बंडखोरांशी संवाद साधून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये काही जागांवर यशही आले आहे. महायुतीला रायगड, ठाणे येथील निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले आहे. दरम्यान, आता एकीकडे विधानपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू असताना आता दुसरीकडे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी खासदार शरद पवार यांना तडकाफडकी फोन कॉल केला आहे.

सुनेत्रा पवार यांनी फोन कॉल का केला?

पुणे विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक ही आता बिनविरोध झाली आहे. कारण शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. हा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी स्वत: शरद पवार यांनी श्रीकांत पाटील यांना फोन कॉल केला. श्रीकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी सुनेत्रा पवार यांनी प्रयत्न केले आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी थेट शरद पवार यांना फोन कॉलद्वारे आपण आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घ्यावा, अशी मागणी केली. या फोन कॉलनंतर शरद पवार यांनीच श्रीकांत पाटील यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आदेश दिला. श्रीकांत पाटील यांनी वरिष्ठांच्या आदेशानंतर या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता पुण्याची निवडणूक ही बिनविरोध झाली आहे.

काकडे यांचाही फोन कॉल

पुण्याच्या जागेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी आपला उमेदवारी अर्जही भरला होता. श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता होती. हीच शक्यता टाळण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांना फोन कॉल केला. काकडे यांनीदेखील शरद पवार यांच्याकडे अर्ज मागे घेण्याबाबत विनंती केली होती