अध्यक्षपदी किरण कांबळे, उपाध्यक्षपदी निखिल कांबळे यांची नियुक्ती
मुळशी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीच्या वतीने मुळशी तालुका युवक कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून, पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आणि तालुक्यातील युवकांना सक्रिय राजकारणात संधी देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मुळशी तालुक्यात पक्षाच्या कामकाजात काही प्रमाणात मरगळ आल्याचे निदर्शनास आल्यानंतर नव्या दमाच्या युवकांना जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. अन्याय, अत्याचाराविरोधात लढणारी आणि सामाजिक प्रश्नांवर सक्रियपणे काम करणारी युवकांची फळी उभी करण्यासाठी राज्यातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून ही कार्यकारणी स्थापन करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) हा पक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर तळागाळात कार्यरत असून, युवकांच्या माध्यमातून पक्ष वाढीसोबत सामाजिक प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मुळशी तालुका युवक आघाडीच्या कार्यकारणीत अध्यक्षपदी किरण कांबळे, उपाध्यक्षपदी निखिल कांबळे, कार्याध्यक्षपदी अमित भोसले, सरचिटणीसपदी तेजस यादव, सचिवपदी अनुज रोकडे, सचिवपदी नवीन पाटणकर, सहसचिव अक्षय कांबळे संघटकपदी अंकुश साखरे, मुळशी धरण विभाग अध्यक्षपदी विक्रम यादव, कोळवण विभाग अध्यक्षपदी अजय गायकवाड संपर्कप्रमुखपदी अक्षय ओव्हाळ तर सहसंपर्कप्रमुखपदी विकास कांबळे यांची निवड करण्यात आली.
यावेळी युवक आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ. विजय मोरे, जिल्हा सचिव आनंद रोकडे, युवक जिल्हाध्यक्ष प्रविण ओव्हाळ, युवा नेते विशाल शेळके, युवक जिल्हा संपर्कप्रमुख आकाश बहुले, माजी अध्यक्ष अशोक निकाळजे, लक्ष्मण जाधव, रामचंद्र जाधव तसेच मुळशी तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
