बालाजीनगर आंबेगाव कात्रज भागाच्या समस्या लवकरच सुटणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा प्रभाग क्र 38 च्या उमेदवारांना शब्द

अश्विनी चिंदे, संदीप बेलदरे,राणी भोसले, प्रतिभा चोरघे,व्यंकोजी खोपडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री आज पुण्यात

कात्रज प्रतिनिधी –:: राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकांसाठी आता प्रचाराला सुरुवात झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे महायुतीचे घटक पक्ष असलेले भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकेत थेट सामना रंगतोय.

प्रभाग क्र 38 मध्ये अश्विनी चिंदे, संदीप बेलदरे,राणी भोसले, प्रतिभा चोरघे,व्यंकोजी खोपडे यांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आज आयोजित केली आहे,

मुख्यमंत्र्यांच्या या सभेमुळे प्रभाग क्रमांक 38 मध्ये नव चैतन्याचे वातावरण पसरले आहे मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हा प्रभाग भाजपाला अनुकूल मानला जातो या प्रभागात दिग्गज सामना पाहायला मिळतो माजी महापौर दत्तात्रय धनकवडे व संदीप बेलदरे पाटील यांच्यात थेट लढत पाहायला मिळते.

दत्तात्रेय धनकवडेना नाराजीचा फटका बसणार

पुण्यनगरीचे महापौर असताना त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या त्या देखील पूर्ण झाल्या नाहीत यामुळे प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने नाराज पाहायला मिळत आहेत.

वर्षांवर्ष ट्राफिकची समस्या कायमच

उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत व दत्तात्रय धनकवडे हे ज्येष्ठ नेते मानले जातात मात्र मात्र त्यांना पालकमंत्र्यांकडून आपल्या भागाच्या समस्या देखील सोडवता आल्या नाहीत; त्याचा देखील फटका निश्चित बसेल असे देखील राजकीय विश्लेषकाकडून बोलले जात आहे.